कंकडालवारांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने राष्ट्रीय महामार्गाचे कामाला सुरुवात…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…
अहेरी… आल्लापल्ली ते गुड्डीगुडम व गोल्लाकर्जी ते रेपनपल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु होता.या मार्गावरून उडणाऱ्या धुळीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.या मार्गांवर अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले होते. मागील एक वर्षांपासून या मार्गांवर फक्त गिट्टी आणि मुरूम टाकले होते. या महामार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरु होता.राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी व कंत्राटदारांचे या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत होता.
मागील एक वर्षांपासून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे कसरत पाहून काँग्रेस
नेते
अजयभाऊ कंकडालवार
यांनी
स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यां
नां निवेदन
दिले होते.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय महामार्गाचे कामाला सुरुवात न केल्यास कंकडालवार यांनी 26एप्रिल ला गुड्डीगुडम येथे चक्काजाम आंदोलन करण्याची तीव्र इशारा दिला होता.प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियत्यांनी काँग्रेस
नेते
अजयभाऊ कंकडालवार
यांची
चक्काजाम
आंदोलन
करण्याची इशाऱ्याची दखल घेत आंदोलनापूर्वीच
संबंधित कंत्राटदाराकडून आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे
कामाला सुरु
वात करायला
लावले.
काँग्रेस नेते कंकडालवार यांनी आंदोलनाची दिलेल्या निवेदनाची उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी गांभीर्याने घेत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित कंत्राटदार आणि कंकडालवार यांचे प्रतिनिधी सोबत बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित अधिकारी
व
कंकडालवार यांचे जनप्रतिनिधी काँग्रेस नेते हणमंतू मडावी,माजी सरपंच अज्जू पठाण,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार
, कार्तिक तोगम, अजय नैताम, सुनीता कुसनाके, सुरेखा आलाम यांचेसमोर
जि.प माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनरूपी मांडलेल्या मागण्यांची विभागामार्फत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
त्यामुळे कंकडालवार यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले.