‘त्या’अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जख्मी…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी..
अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅंच येथील रहिवासी संजय बाला येलेलवार व त्यांची पत्नी कमला संजय येलेलावार ( वय 37 वर्षे ) दामपत्यांनी काल अहेरी येथे आठवडी बाजार असल्याने मासे विक्रीसाठी बोरी येथून अहेरीला दुचाकीने जात असतांना मागून आलेल्या वाहनाने दिना नदीजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने यात कमला येलेलवार यांची जागीच मूत्यू झाला तर यात मृतकाचे पती संजय येलेलवार गंभीर जखमी झाले.मृतक कमला येलेलवार व संजय येलेलवार यांना कल्याणी,मौणिक,रेखा व श्रुती असे चार मुली आहेत.
संजय येलेलवार व कमला संजय येलेलावार हे भोई समाजाचे आहे.संजय हा गोर गरीब परिवारातले असल्याने आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी मोल मजुरी करतात तर त्यांची पत्नी कमला येलेलवार आठवडी बाजारात मासे विक्री करतात.आईच्या मूत्यू झाल्यांची विषय घरचा मुलींना कळताच त्यांच्यावार दुःखाचा डोंगर कोसळला.
या गंभीर घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतले.धडक दिलेले वाहनावर तात्काळ कारवाई होईपर्यंत आम्ही घटना स्थळावरून मृतदेह उचलणार नाही म्हणून येलेलवार परिवारामागे खंबीर पणे उभे राहिले होते. यावेळी परिसरात तणावाचे परिस्थिती निर्माण झाली होती.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील इजपवार यांनी अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल केल्यानंतर मृतक महिलेची मृतदेह घटना स्थळावरून उचलण्यात आली होती. मृतक महिलेच्या मृतदेहावर शवविच्छेदन होईपर्यंत अजय कंकडालवार रुग्णालयात उपस्थित होत.तसेच मृतदेह स्व :गावी राजपूर पॅंच येथे नेण्यासाठी त्यांनी वाहणाची व्यवस्था करून दिले.तसेच अंत्यविधी कार्यक्रमाला काही मदत लागल्यास सुद्धा आपण आपल्यापरिने मदत करण्याचे शब्द दिले होते.
यावेळी अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,अवि सडमेक,वेंकटेश बिलासपल्लीवार,महेश बाकेवार स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.