गोदावरी व प्राणहिता पुलांवर पडलेल्या भेगांची दुरुस्तीसह बंद पडलेले पथदिवे सुरु करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…
सिरोंचा….राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी व प्राणहिता या नद्यावरील पुलांवर ठिकठिकाणी भेगा व खड्डे पडले असून संबंधित विभागाकडून या पुलांवरील भेगांवर तात्पुरता दुरुस्ती करण्यात आले आणि सदरहू काम सुद्धा नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांनी केली आहे.
सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत मुख्य अभियंता ( विशेष प्रकल्प )सा. बां.विभाग गडचिरोली यांना पाठविलेल्या निवेदनातून वरील मागणी केली आहे.
गडचिरोलीचे मुख्य अभियत्यांना पाठविलेल्या निवेदनात,काँग्रेस पक्षाने, प्राणहिता नदीवरील पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंद पडले असून यामुळे पुलावर अंधाराचे सावट आहे. या अंधारामुळे अपघात घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याची मागणी सुद्धा केली आहे.तेलंग
णातल्या कालेश्वर येथे पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत सरस्वती पुष्कर मेळा भरणार असून पुष्कर पुण्य स्नानासाठी लाखो भाविक गोदावरी व प्राणहिता पुलावरून ये-जा करणार आहे, दोन्ही पुलावर कामासाठी टाकण्यात आलेल्या लोखंडी ड्रम,सळाख वाळू व गिट्टीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.गोदावरी नदीपासून ते शिवाजी चौकापर्यंत सुरु असलेलं रस्त्याचे काम संथगतीने सुरु असून सदर काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. जर संबंधित विभागाने तात्काळ निवेदनावर दखल घेऊन एक-दोन दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास धर्मपुरी चौकाजवळ चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा काँग्रेस पक्षाने दिली आहे.
तहसीलदारांमार्फत मुख्य अभियत्यांना निवेदन सादर करतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांचेसमवेत सिरोंचा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लमवार,शंकर मंचार्ला, मोटलाचे उपसरपंच रामचंद्र गोगुला, माजी उपसरपंच लग्गा सत्यन्ना,माजी सरपंच सारय्या सोन्नारी,गट्टू चम्मकारी, संपत अंबाला, समय्या चिलमूला, सडवली मेडिझेरला,भंडारी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.