अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती प्रक्रियेची सी.बी.आय.यंत्रणेमार्फत चौकशी करा..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक व्यवहार झाल्याचे गंभीर आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत केली असून या भरती प्रकरणात भरपूर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत अहेरी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रियेची सी.बी.आय या गुप्तचर यंत्रणे मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रिक्त पदांचे भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती.पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले, मात्र आजवर गावनिहाय आणि गुणनिहाय निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही.तक्रारीनुसार काही अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या नातेवाईकांना संपर्क साधून १ ते २ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकार घडले असल्याचे आरोप करण्यात आले.
जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केली असून,समितीने आज (७ मे) अहेरी येथील प्रकल्प कार्यालयात भेट देऊन समितीने प्रत्यक्ष चौकशीला सुरू केली आहे.सर्व भरतीसंबंधी दस्तावेज,नोंदी व संबंधित अधिकारी-कर्मचारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत.
या भरती प्रक्रियेतील संभाव्य गैरप्रकारांमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,या चौकशीचे निष्कर्ष कोणते खुलासे करतात? याकडे तक्रारकर्तेसह सर्वांचे लक्ष लागले आहे.