सिरोंचा तालुका

सिरोंचा तहसील कार्यालयासमोरची काँग्रेसचे धरणे-आंदोलन तात्पुरते स्थगित…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…

सिरोंचा…… तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत होण्याच्या मार्गावर असतानाच,धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले धरणे आंदोलन निर्णायक ठरले.अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होत असलेल्या या मागणीची प्रशासनाने अखेर दखल घेतली असून, तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे ठोस आश्वासन तहसीलदारांच्या मध्यस्थीने संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सिरोंचा तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेले उन्हाळी धान घरात साठवून ठेवले आहे.हमीभावाने विक्रीची आशा असलेले शेतकरी प्रशासनाकडून खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र,मे महिना उजाडूनही केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांपुढे बिकट आर्थिक संकट उभं राहिलं.काहींनी धान खासगी व्यापाऱ्यांना तोट्यात विकले,काहींचं धान पावसाच्या भीतीने सडण्याच्या स्थितीत आहे.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांनी  शेतकऱ्यांच्या या समस्यावर आवश्यक तोडगा काढण्यासाठी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज दुपार पासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात करण्यात आला.या आंदोलनात धान उत्पादक शेतकऱ्यांची लक्षनीय उपस्थिती होती.

         सिरोंचाचे तहसीलदार नीलेश होणमोरे यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून धान उत्पादक  शेतकऱ्यांचे परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतलं.

            सिरोंचाचे तहसीलदारांनी उपोषण स्थळावरून संबंधित विभागाचे अधिकाऱ्याशी भ्रमणध्वनी वरून उघड चर्चा केली.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या एक दोन दिवसात सिरोंचा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले.

        तहसीलदारांच्या मध्यस्थीने संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी  दिलेल्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवत काँग्रेसने आपले धरणे आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,हा फक्त सुरुवातीचा इशारा होता.जर प्रशासनाने वेळेत कार्यवाही केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याची त्यांनी इशारा दिली आहे.

सिरोंच्यातील धान खरेदी केंद्र उघडण्याच्या मागणीसाठी उभे राहिलेलं हे आंदोलन शांततामय लढ्याचं यशस्वी उदाहरण ठरलं. काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत,शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला.प्रशासनानेही योग्य वेळी प्रतिसाद देत आपली जबाबदारी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close