जि.प.माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते कंकडालवार यांनी करून दिले मृतदेह स्व:गावी पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था…!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवाशी जितमल लचीराम धरावत ( वय 26 वर्षे ) यांचे काल घरगुती भांडण झाल्यामुळे स्वतःच्या घरात रासायनिक औषध पिऊन आपले जीवन संपविले.त्यांचे नातेवाईकांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आली होती.मात्र त्यांची अहेरी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाली.
मृतकाचे घराची परिस्थिती अत्यंत हलखीची असल्याची माहिती छल्लेवाडा येथील कार्यकर्त्यांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना कळवताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात पाठवून मृतकाचे मृतदेह स्व:गावी नेण्यासाठी कुटुंबियांना वाहणाची व्यवस्था करून दिली.तसेच अंत्यविधी कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्या परीने मृतकाचे कुटुंबाला आर्थिक मदतही करण्यात आली.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.