अहेरी तालुकासामाजिक

रानडुकराच्या हल्ल्यातील ‘त्या’ जखमी महिलेला काँग्रेसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार कडून आर्थिक मदत …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…

अहेरी : तेंदूपत्ता तोडाईसाठी गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याने या हल्ल्यात चेरपल्ली येथील रजिता राजेश रामटेके ही  महिला गंभीर जखमी झाल्याने या महिलेवर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

चेरपल्ली येथील या घटनेची माहिती चेरपल्ली येथील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते विनोद रामटेके यांनी  काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना दिली असता त्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन जखमी महिलेची तब्यतीची विचारपूस करून जखमी महिलेची भेट घेऊन तिची आस्थेने विचारपूस करून पुढील वैधकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली.उपचारासाठी बाहेर गावी जात असेल तरी आपण सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याचे चेरपल्ली येथील रामटेके कुटुंबियांना आश्वासन दिले.

अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेटी दरम्यान व जखमी महिलेलाआर्थिक मदत करतांना काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचे समवेत स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,मरपल्ली ग्रामपंचायचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गमसह रामटेके कुटुंबीय उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close