अहेरी तालुकासामाजिक

मांड्रा येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग असलेल्या माँड्रा येते जिल्हा परिषदेचे माजी अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून येथील गावकाऱ्यांसोबत संवाद साधत गावातील विविध समस्या त्यांनी जाणून घेतले. यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पिण्याची पाण्याची समस्या,मुख्य पक्के रस्ते,नाली बांधकाम,असे अनेक प्रमुख समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या कंकडालवार यांच्या समोर मांडण्यात आले असता गावातील सर्व समस्यांची निराकरण करण्याचे प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी कंकडालवार यांनी गावकऱ्यांना दिली.

यासंवाद सभेला माँड्रा ग्राम पंचायतचे सरपंच विलास कन्नाके,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलाम,आविस सल्लागार माणिक मडावी,महादेव मडावी,इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम,राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,अँड.एच.के.आकदर,सत्यम नीलम,संजय सुरमवार ,प्रमोद कोडापे,विनोद दूनालावार, भूजनगंराव आलाम,आशिष सड़मेक,बबी चौधरी,विनोद रामटेके,राकेश सड़मेकसह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close