अहेरीचे भाजप तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी… तालुक्यातील कन्नेपल्ली येथील एका कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या तक्रारीवरून गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजप नेते अंबरीश्रराव आत्राम यांचे खंदे समर्थक व अहेरी तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या विरुद्ध अहेरी पोलिसांनी विविध कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कन्नेपल्ली येथील कापूस उत्पादक शेतकरी कमलाकर राजान्ना बट्टीवार यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कापूस वेचून आपल्या घरी नेट असतांना भाजपचे तालुका रवी नेलकुद्री यांनी भ्रमणध्वनीवरून फोन करून 'तू वेचलेला कापूस मला परत कर ..नाही तर तुला पाहून घेऊ' अशी दमदाटी दिल्याचे बट्टीवार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याने नेलकुद्री विरुद्ध अहेरी पोलिसांनी भा.द
वि.504 व 507 अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद केले आहे.
या प्रकरणाची पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे.भारतीय जनता
पक्षात एका जबाबदार पदावर राहून एका गरीब शेतकऱ्याला पाहून घेण्याची दादागिरीची भाषा वापरल्याने याची सर्वत्र उलटसुलट चर्चा होत आहे.