मूलचेरा तालुकासामाजिक
मच्छिगट्टा येथील सिडाम परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…
मूलचेरा : तालुक्यातील मच्छिगट्टा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस चे जेष्ठ सल्लागार किर्तीमंतराव सिडाम यांचा मुलगा अमर याचा गंभीर आजारपणाने दुःखद निधन झाले होते.
या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून सिडाम कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सह लगाम माजी सरपंच मनीष मारटकर,लगाम माजी उपसरपंच देवाजी सिडाम,बंडू मडावी, विनोद कावेरी,जुलेख शेख,माजी सरपंच विजय कुसनाके,प्रमोद येलमुले,ग्राप सदस्य अनिल सोयाम,सदाशिव मडावी,काशिनाथ मडावी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.