अहेरी तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

विजयादशमी उत्सवानिमित्य दरवर्षी तेलगू भाषिक महिला सद्दूला बतकम्मा खेळत असतात.तेलंगणा राज्यातील रीतिरिवाजा प्रमाणे अहेरी उपविभागात ही तेलगू भाषिक महिला मोठया उत्साहात बतकम्मा खेळत असतात.या बतकंम्मा उत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी अहेरी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक नगरपंचायत कार्यालयात सफाई काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करून महिलांचे आनंद द्विगुणित केले.

या साडी वाटप कार्यक्रमाला नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,वांगेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,बालकल्याण सभापती मीना ओंडरे,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नगरसेविका नौरास शेख,नगरसेवक विलास सिडाम,नगरसेविका ज्योती सडमेक,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गालबाले,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिलागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close