अहेरी तालुका

पुसूकपल्ली येथील बतकम्मा उत्सवाला माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार यांनी दिली भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …अहेरी

📝अहेरी :- गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात सुद्धा या उत्सवाला अनन्य महत्व आहे. नुकतेच अहेरी तालुक्यातील नागेपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पुसकपल्ली येथे पंचायत समिती अहेरीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी भेट देऊन बतकम्मा कार्यक्रमात सहभाग घेऊन बातकम्मा उत्सव साजरा करून महिलांशी विविध विषयावर चर्चा केली.
तेलुगु भाषिक राज्यात बतकम्मा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नवरात्र उत्सव काळात बतकम्मा उत्सव हि साजरा करण्यात येतो. अशातचा पंचायत समिती अहेरीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी पुसकपल्ली येथील बतकम्मा उत्सवाला भेट देवून महिलांशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत,नगरसेविका सौ.सुरेखाताई गोडसेलवार,ग्राम पंचायत सदस्य श्री.राकेश कूड़मेथ,विनोद रामटेके,आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close