अहेरी तालुका

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वीक्तृत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार बसले बेमुदत आमरण उपोषणाला

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी येथील नगरपंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी अहेरी यांचेकडून मंजुरी प्रदान केलेल्या अकृषिक आदेशानुसार नियम ब अटीचे उलघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी यासाठी स्विकृत नगर सेवक प्रशांत गोडशेल वार ३०/८/२०२२ पासुन आमरण उपोषणाला बसले होते तेव्हां उपविभागीय अधिकारी अहेरी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन भ्रष्टाचार व नियमबाह्य झालेला कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले व संबधित अधिकाऱ्याला व सोबत ३० जणांना ५ तारखेला चौकशी साठी हजर राहण्याचे सख्तआदेश पण काढ्न्यात आले.त्यामुळें ले आऊट धारक व रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या कंत्राटदार व संबधित अधिकार्यांचे धाबे दणाणले होते.मात्र
नगर सेवक श्री.प्रशांत गोडसेलवार यांना दीलेल्या आश्वासनं मुळे उपोषण मागे घेतले होते होते पण लेआऊट धारक आपापल्या लेआऊट मध्ये रस्त्यांचे कामाला सुरुवात केली नाही व त्या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यात आली नाही,तसेच प्रॉपर्टी कार्ड 1409 सीट क्र.9 ची कायदेशीर करवाई करण्यात आली नसून आदिवासीची प्रॉपर्टी गैरआदिवासीच्या खरेदी-विक्री करणे,भूमी अभिलेख अधिकारी श्री.एन.जी .पठाण यांच्या कार्यकाळात झालेल्या फेरपर व आलापली,नागेपली गावठाण बाबत चौकशी करणे,अहेरी येतील साझा क्र.1 मधील अतिक्रमण नोंदी व उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे नोंदींनीच्या सखोल चौकशी करणे,अहेरी येतील 207 जमिनीचे हक्कदारचे मय्यतनंतर खोटी संमती दाखवून पोटहिस्सा केलेल्या प्रकरणाची व मय्यत झालेल्या व्यक्तीला परत जिवंत दाखवून एन.ए.पी 34 करीता मागणी केलेल्या बाबतीत चौकशी करणे,तसेच अहेरी येतिल गावठान 1921-22 मध्ये असलेल्या सर्वेनुसार गावठान नकाशात नोंद असलेले रस्ते सन 1974-75 मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठान नकाशात ते रस्ते दिसून येत नसून ते गायब झाले असून वरील सर्व मागण्यांच्या चौकशी करून करवाई करण्यात यावी यांबाबत दिनांक 11/08/2022 ला अहेरी नगरपंचायत व उपविभागीय अधिकारी यांना पत्र देवून माहिती देण्यात आली व उचित करवाई ना झाल्यास दिनांक 30/8/2022 ला उपविभागीय कार्यालय अहेरी येते आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आली होती व दिनांक 30/8/2022 ला उपोषण बसण्यात आली तेंव्हा उपविभागीय अधिकारी दिनांक 2/9/2022ला उपोषण स्थळी भेट देवून सदर मागण्याबाबत कार्यालयाकडून योग्य ती चौकशी करून करवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्यास सांगितले त्यामुळे प्रशासनाचे मान राखून उपोषण मागे घेण्यात आले.मात्र 8 महिन्याच्या कालावधी लोटूनही सदर मागण्याच्या पूर्तता केले नसल्याने आज दि.20/04/2023 पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी येते आमरण उपोषणाला बसण्यात आले आहे..

उपोषणला उपस्थित अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, अशोक येलमुले, अजय सडमेक,मरपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगाम,नरेंद्र गर्गम, विनोद रामटेके प्रमोद गोडसेलवार राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close