सुरजागड येथील जड वाहनांमुळे नागरिकांना त्रास !प्रशासनानी वाहतुकीवर नियंत्रण ठेवावी !
सूरजागड येथील जड़ वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास : प्रशासनानी वाहतुकीवर नियंत्रण ठेवावी
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी
अहेरी तालुक्यातील काल वादळी पावसामुळे तालुक्यातील व आष्टी महामार्गवरील शांतीग्राम लगाम गावाजवळ सुमारास तीन चार घंटे वाहतूक ठप्पा झाले होते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून परत निवास्थानी येत असताना महामार्गवार चार – पाच किलोमीटर लावलेल्या सुरजागड लोहा प्रकल्पचे गाड्याच्या रांगा लागून होते, चंद्रपूर, अहेरी, एटापल्ली जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा अडकले होते. सुरजागड प्रकल्प झाल्यापासून या मार्गावरील लोकांना अशा अनेक अडचणीना तोंड द्यावा लागत आहे. मात्र या समस्या कडे वाहतूक प्रशासनाचे कोणतेही अधिकारी रस्ते सुरळीत करतांना दिसत नव्हते त्यामुळे या मार्गांवर प्रशासनने वाहतूक नियम व अटी ठेवून वाहतूक नियंत्रक ठेवण्यात यावी अशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली आणि पोलीस निरीक्षक अहेरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आले.