अहेरी तालुका

भाजप व रा.कॉ(अजित पवार)कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश..!

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडलवार यांनी केले नवोदित कार्यकर्त्यांचे पक्षात जंगी स्वागत..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी…

मूलचेरा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मूलचेरा तालुक्यातील उदयनगर,श्रीनगर व मूलचेरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट )व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आप पक्षाला राम राम करीत काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन स्वतः होऊन सगळे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे सुशान विश्वास,शंकर सरकार,अमूल्य सरकार,भूपाल रॉय,सुमित मिस्त्री, वासुदेव मंडलं,निरंजन भयरागी,चंदन शील,संजय वैध,विनय शाना,रमेश विश्वास,विप्लाव विश्वाससह अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) व भाजपाचे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या नेतृत्वावर तर काँग्रेस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रम पार पडला.

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

यावेळी कुणाल हलदार,माजी उपसरपंच अशोक येलमुले,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close