माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सिमेंट कांक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय आवलमरी अतंर्गत लंकाचेन येथील शंकर पोच्या दुर्गे यांच्या घरापासून चंदृ भगवान कुलमेते यांच्या घरापर्यंत सिमेंट कांन्क्रीट रस्ता 195 मी. 20 लक्ष रु.व बुधय्या करपेत ते बापू करपेत यांच्या घरापर्यंत सिमेंट कँक्रेट रस्ता 190 मी. 20 लक्ष तसेच शामराव कुळमेते ते मदनय्या कुमराम यांच्या घरापर्यंत सिमेंट कँक्रेट रस्ता 195 मी. 20 लक्ष असे एकूण 60 लक्ष रुपयाचे विकासकामें मंजूर झाले असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील नागरिकांना दार पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणम होत होता आणि
चिखलातून ये-जा करावा लागत होता.त्यामुळे रस्ता बांधकाम आवश्यक असल्याने आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे गावातील नागरीकांनी सिमेंट रस्त्यांसाठी मागणी केली असता माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या प्रयत्नाने गावात पक्के रस्ते मंजूर झाले असून या रस्त्यांचे आज भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न झाला.या पक्के रस्त्यांच्या बांधकामामुळे येथील नागरिकांना सोयी सुविधा होणार असल्याने लंकाचेनू गावातील नागरिकांनी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे आभार मानले.
तिन्ही रस्त्याचे भूमिपूजनाप्रसंगी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नारपंचयातचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सरपंच सौ.सुनंदा कोडपे,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,माजी सरपंच मारोती मडावी,ग्रा.प.सदस्य विमला छटारे ,ग्रा.प.सदस्य कमलाबाई आत्राम,नामदेव मडावी,नानाजी मुरमाळे,बाबुराव बट्टी,पोचम मडावी,वैकंना कोडपे,पोलीस पाटील मनोहर पांगळे, साबय्या कुळमेते,चंदु कुळमेते,रमेश सडाम,महेश पानेम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.