व्येंकटापूर येथील तेरवी कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील व्यंकटापुर ग्रामपंचायतचे उपसरपंच व आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कट्टर समर्थक चिरंजीव चीलवेल्वार यांचे वडील स्व.शंकरय्या चिलवेल्वार यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले असुन.आज तेरवी कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते वा लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडलवार यांनी उपस्थित राहून.चीलवेल्वार कुटुंबियांना मोठ्या आस्थेने विचारपूस करून कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुगंधा कोडापे,माजी ग्रामपंचायत सरपंच मारोती मडावी,व्यंकन्ना कोडापे,पूजारी काका,परकिवार काक,ग्रामपंचायत सदस्य महेश लेकुर,वसंत तोरम,विमल चटारे,शंकर आत्राम,नरेंद्र गर्गम,संजय गोंडे,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.