अहेरी येथील गृहरक्षक दलाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक होमगार्ड ला 365 दिवसा पैकी 180 दिवस बंदोबस्त कामी ठेवण्यात येईल,असे राज्याचे हिवाळी अधिवेशनात विधान केले होते.परंतु या विधानाशी होमगार्ड कर्मचाऱ्यांनी सहमत न होता 365 दिवसा पैकी सुट्टीचे दिवस वगळून वर्षभर काम द्यावे,बेसिक लागू करावा,पेन्शन द्यावे आदी मागण्यांच्या पुरतेतेसाठी दि. 21/8/2023 पासून मुंबई येथील आजाद मैदानावर साखळी उपोषणाला बसणार असल्याने अहेरी तालुक्यातील होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मुबंई येथील आंदोलनात सहभाग होण्यासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन आर्थिक मदत करण्याची विनंती केली असता त्यांनी किंचितही विचार न करता तात्काळ गृहरक्षक दलाला मुंबई दौऱ्यासाठी आर्थिक मदत दिली.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती भास्कर तलांडे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगम,माजी उपसरपंच अशोक येलमुले,नरेश गर्गम,रवी भोयर,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते