अहेरी तालुका
आल्लापल्ली येथील तेरवी कार्यक्रमाला जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची कार्यकर्त्यांसमवेत उपस्थिती..!

अहेरी : आल्लापल्ली ग्रामपंचायतचे सदस्या उषाताई आत्राम यांचे पती राजू गोमा आत्राम यांच्या मूत्यू दि.26-8-2023 ला झाले होते.त्यांचे कुटुंबीयांनी त्यांच्या तेरवीची कार्यक्रम 13-10-2023 ला आयोजित केले होते.या तेरवी कार्यक्रमाची निमंत्रण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना दिली असता त्यांनी आत्राम कुटुंबियांची निमंत्रणाला मान देऊन आपल्या कार्यकर्त्यां समवेत आल्लापल्ली येथे जाऊन तेरवी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आत्राम कुटिबियांची सांत्वन केले.
या तेरवी कार्यक्रमाला जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांचे सोबत अहेरी न.पं. चे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,माजी सरपंच अशोक येलमुले,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.