समाज मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत ..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆मूलचेरा◆: मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे,समाजाची प्रगती करायची असेल तर समाज बांधव एकत्र येऊन चर्चा करण्यास स्वतःची हक्काची एक समाजमंदिर असायला हवी अशी समाजातील जेष्ठ व्यक्तींनी बैठक घेऊन समाजमंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले. आदिवासी गोवारी समाजमंदिर बांधकामाची माहिती आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना माहिती देताच आलापल्ली येथील निवासस्थानी समाज बांधवांना बोलावून मलेझरी येथे आदिवासी गोवारी समाजबांधवासाठी भव्य समाजमंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत दिले.व भविष्यात आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यासाठी मी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले.समाजमंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याने आदिवासी गोवारी समाजबांधवांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले. या वेळी गोवारी समाज अध्यक्ष विलासजी राऊत,आविस सल्लागार रामचंद्रजी शेडमाके,रामदास कोसनकार,आकाश नागोसे,सचिन राऊत,राहुल लोहट,आकाश राऊत,लक्ष्मण राऊत,राम राऊत,तुळशीदास नेवारे,गणेश नेव्हारे,शरद ठाकूर,मारोती नेवारे,निफुल गायकवाड,शंकर खंडारे,सुरेंद्र नागोसे,प्रणय शेडमाके,शेखर पोरेते,स्वप्नील सुरपाम सह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.*