वेलगुर येथील शीतल माता मंदिराचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील वेलगुर येथील 7 फेब्रुवारी रोजी आविसं काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वेलगुर दौऱ्यावर येऊन येथील नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
चर्चात अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आली.तसेच गावातील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहत कार्यक्रम घेण्यासाठी अडचण बसत होते.प्रत्येक वैक्तिकक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असे सर्व प्रथम माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करूनच बाकी कार्यक्रम पार पडत असत.असे बैठकी दरम्यान अजयभाऊ यांना सांगून. माता मंदिर निर्माण करा म्हणून अजयभाऊ यांना मागणी केले आहे.
त्यावेळी अजयभाऊंनी सांगितले की शासकीय योजनेतुन निधी उपलब्ध होत नाही मात्र माझ्या स्व : खर्चाने माता मंदिर बांधून देतो म्हणून नागरिकांना आश्वासन दिले होते.दिलेले आश्वासन नुसार माता मंदिर भूमिपूजन अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण दिसून आले आहे.त्यावेळी अजयभाऊंची आभार मानले आहे.
यावेळी उपस्थित अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर्,गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद गोडसेलवार, अस्यांना दुधी माजी सरपंच वेलगुर,मनोहर पाटील चालूरकर,रवी गवत्रे,काशिनाथ गद्धेकर,प्रफुल ओंदरे ,सुळताबई चाकूरकर,कमलाबाई राऊत,गणपत मडावी,वासुदेव मडावी, सुगांदा दुधी,निशा झाडे,मीनाबई जंगमवार,सुनीता बावणे,मारोती बावणे,संजय बावणे,दिलीप दुर्गेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.