सिरोंचा तालुका

मोटला टेकडा गावात नवीन विद्युत ट्रान्सफार्मर लावा…नाही तर बंद पडलेल्या ट्रान्सफार्मरला श्रद्धांजली वाहू…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली या गावाजवळील टेकडा मोटला गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद पडली आहे. सदर
विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे टेकडा मोटला गावातील ग्रामस्थांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.
पावसाळ्याच्या दिवस सुरु असून गावात विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील पिण्याची पाण्याची समस्या, वृद्ध आणि लहान मुला-मुलींना नानाविध त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत
ग्रामस्थांनी संबंधित विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांना गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्याचे माहिती दिल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केली आहे. मोटला टेकडा या गावात
लवकरात लवकर विद्युत महावितरण अधिकाऱ्यांनी नवीन विद्युत ट्रान्स फार्मर बसवून गावातील विद्युत पुरवठ्याची समस्या दूर न केल्यास बंद पडलेल्या ट्रान्सफार्मरला श्रद्धांजली वाहून तीव्र आंदोलन छेडू, असे इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला सह गावकऱ्यांनी दिली आहे.
त्यावेळी टेकडा मोटला ग्रा, पंचायतचे उपसरपंच रामचंद्र गोगुला, सह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close