इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.किरसान यांच्या प्रचारार्थ कंकडालवार यांची अनेक गावांमध्ये कॉर्नर सभा…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी…
अहेरी : लोकसभा निवडणुकीच्या शेवटचं टप्प्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी कंबर कसले असून पायाला घुंगरू बांधल्यासारखं रोज तब्बल वीस गावांना भेटी देऊन कॉर्नर सभांमधून मतदारांचे लक्ष आपल्या पक्षाचे उमेदवाराकडे केंद्रित करण्याचं प्रयत्न करीत आहे.आणि या प्रचाराचे कॉर्नर सभांना मतदारांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची अजयभाऊ कांकडालवार यांच्या समर्थकांकडून बोलल्या जात आहे.
काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या समर्थकांसोबत विधानसभा क्षेत्रातील दररोज वीस गावांना भेटी देऊन इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. किरसान यांच्या नियोजन बद्ध रित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यातील एक भाग म्हणून त्यांनी अहेरी तालुक्यातील झिमेला, गुडडी गुडम, छेल्लेवाडा, कोडसेलगुडम,कमलापूर आदी गावांमध्ये त्यांनी कॉर्नर सभा घेतल्या.या सभांना या गावांमधील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकसभेची ही लढाई येत्या एक दोन दिवसांत अहेरीचे घराणे विरुद्ध अजयभाऊ कंकडालवार असे चित्र रंगणार असल्याने याची काळजी घेत कंकडालवार यांनी सुद्धा दोन हात करण्याची पूर्व तयारीने मैदानात उतरल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होतांना दिसून येत आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेच लढत होणार असून यात महायुतीच्या बाजूने अहेरीचे आजी-माजी मंत्री प्रचाराची धुरा संभाळत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे समन्वयक कंकडालवार व मित्र पक्ष प्रचाराची धुरा संभाळत आहे.असे असले तरी मताधिक्याची जबाबदारी मात्र अजयभाऊ कंकडालवार यांच्या खांद्यावर असल्याने त्यांना या निवडणुकीत जास्त जोखीम उचलावं लागत आहे.
कडक उन्हाची पर्वा न करता अजयभाऊ कंकडालवार हे आपल्या समर्थकांसह मित्र पक्षांचे मदतीने आपल्या पक्षाचे उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. इंडियाचे आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून काँग्रेसचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन या भेटीत स्व: पक्षाचे पदाधिकारी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक संवाद साधत आहे.एकंदरीत अहेरी विधानसभा क्षेत्रात इंडिया आघाडीत सकारात्मक वातावरण निर्मिती करून महायुतीचे उमेद्वारांपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्याचे त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहे.