अहेरी तालुकासामाजिक

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतल्या देवलमरी येथील महिलांच्या समस्या

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील महिला ग्राम संघाच्या महिला मंडळाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आला.या चर्चासत्राला आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून महिलांच्या विविध समस्या जाणून घेतल्या .

या चर्चासत्रात महिलांच्या विविध अडचणी राष्ट्रीयकृत बँक,विजेची समस्या,घरकुल योजना,पिण्याच्या पाणी यासह अनेक प्रकारच्या समस्या माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या समोर मांडण्यात आला होता. यावर अजयभाऊ कंकडालवार यांनी महिलांच्या अडचणी व समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा आश्वासन दिला.यावर उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.महिलांच्या या चर्चासत्राला देवलमरी येथील महिला ग्राम संघाचे महिला मंडळी परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी, देवलमरीचे माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट, ग्रामपंचायत देवलमरीचे उपसरपंच हरीश गावडे , ग्राम पंचायत सदस्य विद्याताई राऊत,ग्रामपंचायत सदस्य संजूबाई आत्राम,ग्रामपंचायत सदस्य विमलाताई कुर्री, ग्राम पंचायत सदस्य महेश लेकुर,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पठाण, माजी ग्राप सरपंच गुलाबराव सोयाम, वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी, माजी ग्राप सदस्य अरूण मज्जरवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,नरेंद्र गर्गम, लक्ष्मण आत्राम,श्रीनिवास राऊत,संतोष परसा, सुधाकर लेकुर,शंकर आत्राम,सुधीर बामणकर,सदाशिव बामणकर,नागेश राऊत,संजय गोंडेवार,रमेश मेशिन,संदीप दुर्गे, सचिन पांचार्यासह परिसरातील महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close