अहेरी तालुका

भुजंगरावपेठा येथील काटले व मडगेम कुटुंबियांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या भुजंगरापेठा येथे 13 एप्रिल गुरुवार रोज सायंकाळी जोरदार वादळ-वारा सुटला होता त्या वादळवाऱ्यात यशोदा शंकर काटले व यशोदा शंकर मडगेम यांच्या घरावरील टीनचे छत सम्पूर्ण उडाले होते यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आला होता. सदर बाब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांना बोलावन्यात आले तसेच प्रशासनाकडून आताचे आता नुकसान भरपाई मिळत नाही.त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या दोन्ही कुटुंबाला धीर दिले.

यावेळी उपस्थित श्रीनिवास पेंदाम सरपंच कमलापूर,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राजू दुर्गे सदस्य महागाव,वंदना दुर्गे सदस्य महागाव,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close