अहेरी तालुका

अहेरी नगर पंचायतकडून सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ..अहेरी

📝अहेरी नगर पंचायत अतंर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 17 येथे श्री.पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे ते गणपती इस्टाम पर्यंत असे लाखोंचे कामाचे सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन सोहळा अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत यांच्या हस्ते करण्यात आले.अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना याकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र यावेळी सत्ता परिवर्तन होताच सदर समस्याकडे लक्ष देवून नगर पंचायतच्या अण्णाभाऊ साठे या विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आली या रस्त्यांच्या बांधकामामुळे नागरिकांना सुविधा होईल.या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, मीनाताई ओंडरे बालकल्याण सभापती न.प.अहेरी,जोतीताई सडमेक नगरसेविका अहेरी,सुरेख गोडसेलवार नगरसेविका .निखत शेख नगरसेविका अहेरी,श्री.विलास सिडाम नगरसेवक,विलास गलबले नगरसेवक ,महेश बाकेवार नगरसेवक ,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,अजय साळवे मुख्याधिकारी ,सुजित आमने प्रशासकीय अधिकारी ,वैभव पांढरे कर निर्धारक,गोविंदा दुर्गे,आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close