अहेरी तालुका

गोरगरिबांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क….

📝अहेरी दि. 19 नोहेंबर 2022 ला अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्राम पंचायत हद्दीतील छल्लेवाडा येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आली होती.परिसरातील कानाकोपऱ्यातून आदिवासी विध्यार्थी संघाचे कार्यकर्ते एकत्र आले होते,यावेळी उदघाटन स्थानावरून मार्गदर्शन करतांना म्हणाले आदिवासी विध्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा वाटा असून याच आम्हाला अभिमान असून जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर आहेत, वेळ देऊन संघटनेच्या काम समोर वाढवित आहेत हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळाले की नाही , त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे व स्वत पुढाकार घ्यावा व संघटन तालुक्यातील ग्रामीण परिसरात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावा.असे सांगतांना गेल्या अनेक वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अविस संघटनेचा काम करीत आहे सर्वांना काम करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असतो परंतु संघटने सोबत नागरिकांना सुद्धा वेळ देणे गरजेचे आहे व जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन करत असताना जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हणाले कि,आज छल्लेवाडा गावात सुंदर रस्ते झाले आहेत,मी या क्षेत्रांतून प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आलो तेंव्हा काय परिस्थिती होती,आज या गावामध्ये जे सोईसुविधा आहेत ते आपण केलेले आहेत आज पर्यंत केलेले कामे कुठे घेलेत अशीच खळबळ जनक प्रश्न केले.असून मी या क्षेत्रांतून निवडून आलो नसलो तरी आम्हाच्या उमेदवाराला या क्षेत्रातून निवडुन दिले त्यामुळे मी जि.प.अध्यक्ष बनलो व मी आज हक्कानी सांगतो कि,या जिल्हात व तालुक्यात सर्वाधिक निधी या रेपनपली-उमानूर क्षेत्रात देण्यात आले असून आज विकासाचे कामे दिसत आहेत,त्यात आरोग्य,शिक्षण,पाण्याच्या समस्या असेल व वैयक्तिक अडीअडचण असेल आपण नेहमी मदत केली असून येणाऱ्या काळात आपण नेहमी तुम्हाच्या सोबत उभी राहण्यासाठी तत्पर आहो.अशी ग्वाही यावेळी दिली.यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर,कमलापूरचे सरपंच श्री.श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच श्री.सचिन ओल्लेटीवार,सामाजिक कार्यकर्ते अँड.एच.के.आकदर,डॉ.आर मानकर एटापली आविस सचिव श्री.प्रज्वल नागूलवार,ग्राम पंचायत सदस्य श्री.लक्ष्मण कोडापे,महागाव ग्रा.प.सदस्य श्री.राजू दुर्गे,प्रणाली मडावी,पूजा रामटेके,इंदू पेंदाम,अभिलाषा डोंगरे,समया कोंडागूर्ले,आदि मंचावर होते.कार्यक्रमाचे संचालन श्री.दुर्योधन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.दासू कांबडे यांनी केली.या यशस्वी मेळावाचे आयोजन श्री.विलास बोरकर,गुलाब देवगडे,शंकर बासरकर,लक्ष्मण झाडे,राहुल सुंदिला,अशोक झाडे,वागू निमगडे,लक्ष्मण जनगाम,मनोहर बासरकर,रवि दुर्गे,वैकुंटम आकुदारी,नागेश ताटिपेली,महेश भगत,हनमंतू ठाकरे,प्रशांत गुरनूले,श्रीनिवास लेंडगुरे,मोंडी कोटरंगे,स्वामी ठाकरे,वसंत चव्हाण,विलास सिडाम,वासुदेव सिडाम,सुरेश ठाकरे,किष्टाया गुरनूले,नारायण कोटरंगे,श्रीहरी गुरजाला,रवि चव्हाण,रवि सोतकु,रजित सभावा,सुरेश चव्हाण आदि परिश्रम घेतले.या मेळाव्याला परिसरातील पुरुष-महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close