लगाम येथील रात्रकालीन 30 यार्ड क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
लगाम..येथील नवराष्ट्र युथ क्रिडा मंडळाकडून आयोजित रात्रकालीन टेनिस बॉल 30 यार्ड खुले क्रिकेट सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडला. या उदघाटनीय सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविस नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून लगाम ग्राम पंचायातचे माजी सरपंच मनीष मारटकर, माजी उपसरपंच देवाजी सिडाम, शांतिग्रामचे उपसरपंच श्रीकांत समतदार, आल्लापल्ली ग्राम पंचायातचे माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,सुधीर पेसेट्टीवार, आविस सल्लागार मारटकर काका,शंकर पानेम,महेश नैताम,साईनाथ पानेमवार,माजी सरपंच वासुदेव मडावी,लिंगा टेकुलवार,शामरावजी आत्राम,उमेश भोयर,रमेश सिडाम,संतोष मडावी,बंडू मडावी,धनतेश सिडाम,मुख्याध्यापक बारसागडे सर,कोंडावार सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थितांना क्रिडा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम,द्वितीय पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर तृतीय पुरस्कार स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांकडून ठेवण्यात आले. क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळा यशस्वी आयोजनासाठी नवराष्ट्र युथ क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणानी परिश्रम घेतले