बामनपल्ली येथील शेतकरी कुटुंबाला अजयभाऊ कंकडालवार कडून आर्थिक मदत…!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… प्रतिनिधी…
भामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम अंतर्गत येत असलेल्या बामनपल्ली येथील रहिवाशी बुचय्या समय्या नीलम ( वय 40 वर्षी ) यांनी शेतीचे काम करून कुटुंबा उदरनिर्वाह चालवत होती.अचानक बुचय्याला पोटात दुखणे झाल्याने त्यांना आलापल्ली येथील खाजगी सेवासदन हॉस्पिटल ला भर्ती केले होते .मात्र डाक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात यावी म्हणून त्यांचे नातेवाईकांना सांगितले होते.
नीलम परिवार अंत्यत गरीब असून चंद्रपूर दवाखान्यात भर्ती होण्यासाठी नीलम कुटुंबाला आर्थिक अडचण भासत होती.या आर्थिक मदतीची विषय आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना
कळताच त्यांनी बुचय्या नीलम यांची चंद्रपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिले.तसेच दवाखान्यात औषध उपचारासाठी आर्थिक मदतही केली.त्यावेळी नीलम कुटुंबातील सदस्यांनी अजय कंकडालवारांची आभार मानले. या
मदती दरम्यान अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.