Travel

केंद्र सरकारच्या ‘हिट अँड रन’ या कायद्याचा विरोधात अहेरी व आल्लापल्ली येथील चालक- मालक संघटना रस्त्यावर!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : केंद्र सरकारच्या हिट अँड रन या कायद्याअंतगर्त नवीन नियमानुसार महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास आणि दुर्घटना स्थळावरून ड्राइवर पसार झाल्यास त्याला ७ लाख रुपये दंड व १० वर्ष कारावास अशी तरतूद केली आहे.सदर कायद्या मान्य नसल्यामुळे हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चालक -मालक संघटना अहेरी व आलापल्ली कडून आंदोलन सुरू असून या आंदोलनाला जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार स्वतः उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.

तसेच उद्यापासून वाहन जिथे आहे तिथे सोडून बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व आलापल्ली येथे वीर बाबुराव चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चालक- मालक संघटना अहेरी व आलापल्ली कडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close