किष्टापूर येथील पोलीस पाटील पिपरे यांची तब्यातीची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आस्थेने विचारपूस
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….
अहेरी तालुक्यातील वांगेपली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या किष्टापूर येथील रहिवासी असलेल्या पोलीस पाटील विजय सदाशिव पिपरे यांना कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्याच्या उपचार नागपूर मधील मेमो हाँस्पिटलमध्ये उपचार करत असून ऑपरेशन करून आपल्या स्वगावी आले असल्याचं माहिती किष्टापूर येथील कार्यकर्तेकडून आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळतच त्यांनी कॅन्सर ग्रस्त विजय सदाशिव पिपरे पो.पा.यांच्या घरी जावून तब्बेतीचे आस्थेने विचारपूस केले असून पुढील औषधंउपचारा करिता आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितले आहे.
यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निर्मला अशोक येलमुले,बाजार समिती संचालक तथा नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,संचालक सैनु आत्राम,संचालक प्रमोद पेंदाम,संतोष येरमे,माजी उपसरपंच अशोक येलमुले,विनोद रामटेके,राकेश सदमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.