राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आदिवासी विद्यार्थी संघात जाहीर प्रवेश ..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पूसूकपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते गणेश येलूर यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करत आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून प्रवेश केले.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षात प्रवेश घेतले असून नवनिर्वाचित कार्यकर्तांच्या शाल व दुप्पटा टाकून स्वागत केले आहे.
यावेळी उपस्थित नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुडमेथे,बाजार समिती संचालक सैनू आत्राम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,किशोर जावदे ,मल्लेश येलेकर,सुरेश येलूर,राजेश येलूर,राजेश उडतावार,महेश भोयर,विनोद भोयर, रमेश डोके,बाबुराव चौधरी, अशोक चौधरी, रविंद्र भोयर, धर्माय्या केरकर, मनोज भोयर, विनोद रामटेके, रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते