अहेरी तालुकाधार्मिक कार्य

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सुगमसंगीत कार्यक्रमाचे उदघाटन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : अहेरी शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुर्गा व शारदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.काल अहेरी येथील आदर्श दुर्गात्सव मंडळ तर्फे सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या सुगम संगीत कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आला. यादरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांनी दुर्गा मातेची दर्शन घेतले.

या सुगम संगीत कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नरेंद्र गर्गम, कुमार गुरनुले,अजय सडमेक,महेश गेडाम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close