अहेरी तालुका

भाजपचे गटनेत्या शालिनी पोहणेकर यांचे तक्रारातील आरोप बिनबुडाचे ! रोजा करपेत नगराध्यक्ष न.पं. अहेरी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी …स्थानिक नगरपंचायत अहेरी क्षेत्रातील चालता क्रमांक 87 सार्वजनिक रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामाला मदत व समर्थन केल्याचे अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत व आठ नगरपंचायत सदस्यांनी समर्थन केल्याबद्दल भाजप गटनेत्या सौ. शालिनी संजय पोहणेकर यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे तक्रार केल्या असता काही वृत्तपत्रात प्रकाशित बातमीच्या आधारावर आम्हास सदर प्रकरणाची माहिती प्राप्त झाली.जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिनियम 1965 नुसार कलाम 44 अन्वये नगराध्यक्षा रोजा करपेत व आठ सदस्यांना दिनांक 10 जानेवारी 2023 ला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे नोटीस मिळाल्याचे वृत्तपत्रात प्रकाशित बातम्यांमुळे आम्हला ही माहिती मिळाली. परंतु आम्हाला जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडून संबंधित विषयाबद्दल आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे रितसर नोटीस मिळालेली नाही. यामुळे भाजप गटनेत्या पोहणेकर ह्या नगरपंचायत विरुद्ध चुकीची माहिती माध्यमांना देऊन लोकांची दिशाभूल करीत आहे ,असे आरोप अहेरीचे नगरअध्यक्ष रोजा करपेत यांनी केली आहे.

नगरसेविका सुरेखा गोडसेलवार यांचे अर्जनुसार मासिक सभेत चर्चा …

नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये अजय रामय्या कंकडालवार यांनी बांधण्यात येणारी इमारत व स्लॅप बांधकामबाबत लोकांची कुठल्याही प्रकारचे हरकत नसल्याबाबत विषयाकिंत अर्जावर चर्चा करत असतांना त्या बांधकामाबाबत कोणताही त्रास होत नसल्याचे संमतीपत्र शेजारच्या मालमत्ता धारकांनी 100 रुपयाच्या स्टँप पेपरवर समत्तीपत्र नगरपंचायत ला लिहून दिले. या स्टॅम्प पेपरच्या आधारावर सभेत सविस्तर चर्चा केल्यानंतर या बांधकामामुळे स्थानिक जनतेस कोणताही त्रास होत नाही असा ठराव बहुमत्ताने घेण्यात आला. परंतु इमारत बांधकाम किंवा स्लॉप क्रिकेट बांधकामाची रितसर परवानगी देणे केवळ नगरपंचायत मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचे असतात.बहुतेक याची माहिती भाजप गटनेत्या शालिनी पोहणेकर यांना नसेल ?

उदा. विज पुरवठा नाहरकत प्रमाणपत्र, घर, टॅक्स पावती नोंदणी करणे व वैध बांधकाम किंवा अवैध बांधकाम अश्या कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी देणे किंवा नाही किंवा कार्यवाही करणे हे सर्व अधिकारी नगरपंचायतचे मुख्याधिकाऱ्यांना असतो.सदर ठरावामध्ये चालन क्रमांक 87 यांच्या वर कुठल्याही प्रकारची आक्षेप नोंद नाही. या बांधकामाला नगराध्यक्ष व किंवा आठ नगरसेवक ठराव क्रमांक 19/5 मध्ये लेखी नोंद असल्याचे नमूद नाही म्हणून यात माझे किंवा आठ नगरसेवकांचे कुठल्याही प्रकारचा ठरावाला समर्थन दिल्याचे स्पष्ट होत नाही.जेव्ह सदर बांधकामाबद्दल भाजपा गटनेत्या व इतर सदस्यांनी बांधकामा विरोधात आक्षेप घेतले असता. नगरपंचायत समधित अधिकारी यांना त्या बांधकामाच्या विरोधात कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांच्या असतो. यात लोकप्रतिनिधीचा नसतो. या प्रकरणात जाणून बाजून होतू पुरस्पर द्वेषभावनेने भाजपचे पक्षाचे गटनेत्या शालिनी संजय पोहणेकर यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे खोटे तक्रार करून शासनाची व लोकांची दिशाभूल करीत आहे. असे आरोप नगराध्यक्ष रोजा करपेत यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे .या बाबत आम्ही त्यांच्या खोट्या तक्रारींचे खंडन करीत करीत असल्याचे सांगत आम्ही नगराध्यक्षा व आठ नगरपंचायत सदस्य जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे 10/01/2023 ला सबब प्रकरणाबाबत खुलासा आणि उलट तक्रार करणार आहे .भाजप गटनेत्या शालिनी पोहणेकर यांनी कोणत्याही प्रकारचीअभ्यास न करता चुकीचे तक्रार केल्याने पत्रकार परिषद घेऊन आम्ही लवकरच याबाबत आमची भूमिका मांडू असे ही नगराध्यक्ष करपेत यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close