जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मंडपाला दिली भेट.
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : मागील 29 दिवसापासून आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अहेरी येथील तालुका प्राथमिक आरोग्य कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या निराकरणासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.येथील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मंडपाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नुकताच भेट देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेतले.आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागण्या रास्त असल्याने त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मंडपात आपले मनोगत व्यक्त करतांना जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून मागण्यांच्या निराकरणासाठी राज्य सरकार व संबंधित विभागाला पाठपुरावा करण्याची कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले.
आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मागील 29 दिवसापासून बेमुदत आंदोनलाला बसल्यामुळे याची फटका ग्रामीण भागातील रुग्णांवर होत आहे.करिता राज्य सरकार व संबंधित विभागाने योग्य सकारात्मक पाऊल उचलून कर्मचाऱ्यांची मागण्या मान्य करण्याची मागणीही आविसं अजयभाऊ मित्र परीवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार केली आहे.