अहेरी तालुका

राज्याचे कॅबिनेटमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली भेट…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात सगळीकडे महाजनसंपर्क अभियान राबविले जात असून याचीच एक भाग म्हणून आज अहेरी येथे विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे संमेलन घेण्यात आले होते.अहेरी येथील कार्यक्रमाला राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.अहेरी येथे ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आगमान झाल्यानंतर आविसं,अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्या त्यांच्यासमोर मांडून विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक विकासे कामे रखडल्याचे सांगितले.जिल्ह्यातील व विधानसभा क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यात यावी व जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याची मागणी कंकडालवार यांनी राज्याचे कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.तसेच अहेरीनगरीत आगमानाप्रित्यर्थे माजी जि.प.अध्यक्ष कांकडालवार यांनी मंत्रीमहोदयाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भेटी दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यासमवेत अहेरी पं.स.माजी सभापती भास्कर तलांडे, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी जि.प. सदस्य अजय नैताम,ज्योती सडमके नगरसेविका,मिना ओंडरे महिला व बालकल्याण सभापती,सुरेखा गोडशेलवार नगरसेविका सूनीता कुसनाके माजी जिल्हा परिषद सदस्य,सुरेखा आलाम ,नौरास शेख बांधकाम सभापती,विलास गलबले नगरसेवक,महेश बाकेवार,नगरसेवक,प्रशांत गोडशेलवार नगरसेवक,विलास सिडाम नगरसेवक,सुरेखा गोडशेलवार नगरसेविका,गुलाबराव सोयांम माजी सरपंच विद्यमान ग्रा.पं.सदस्य,मीना गर्गम ग्रा.पं.सदस्य,नरेंद्र गर्गम ग्रामीण तालुका अध्यक्ष आविस व अजयभाऊ मिञपरिवार,राकेश आलुरवार,विनोद रामटेके,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close