अहेरी तालुका

छल्लेवाडा येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत रेपणपल्ली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथे लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल दौरा केले होते.या दौऱ्यात त्यांनी छल्लेवाडा येथील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधत गावातील नाली,रस्ते,आरोग्य सुविधा,शिक्षण व मूलभूत गरजांवर चर्चा करण्यात आली.चर्चेदरम्यान छल्लेवाडा येथील वृध्दकलावंत व भजन मंडळी व समस्त नागरिकांनी भजना मंडळाकरिता साहित्य खरेदी करण्यास आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगले असता अजयभाऊंना भजन मंडळाचे व नागरिकांची मागणीला मान ठेवून क्षणाचाही विलंब न करता वृध्द कलावंत व भजन मंडळीला साहित्य घेण्यास आर्थिक मदत केली.त्यावेळी गावातील समस्त नागरिकांनी अजयभाऊंची आभार म्हणले.

छल्लेवाडा येथील संवाद व चर्चा सत्रात माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सरपंच लक्ष्मी मडावी,सरपंच श्रीनिवास पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,गुलाब देवगडे, रामचंद्र रामटेके, तेजराज दुर्ग,दासू कांबळे,विलास बोरकर,लक्ष्मण रत्नंम,मोंडी कोटरंगे,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close