मांड्रा येथे दुचाकी अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर.
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …अहेरी प्रतिनिधी : तालुक्यातील देचलीपेठा येथील तुषार येगडी व त्यांची पत्नी भवानी हे दोघे काल अत्यावश्यक कामानिमित्त मांड्रा येते जात असतांना माड्रा व दामरांचा जंगल परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडून असलेल्या झाडाला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकी खाली कोसडून अपघात घडल्याने या अपघातात तुषार येगडी हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नीला डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या दुचाकी अपघाताची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत मृतकाचे पत्नीची प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले. व या अपघातात मूत्यू झालेल्या तुषार येगडी यांच्या शव विच्छेदन होई पर्यंत उपस्थित राहत मृतदेह घरी पोहोचण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिले.तसेच मृतकाचे अंत्यविधी कार्यक्रमासाठी येगडी परिवारातील नातेवाईकांना अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत सुद्धा केली आहे.
यावेळी कांकडालवार यांचे समवेत उपजिल्हा रुग्णालयात माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गणेश नागपूर,राजू दुर्गे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गेस,प्रमोद गोडसेलवार सह येगडी परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.