मूलचेरा तालुक्यातील पुल्लीगुडम गावाला माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …मूलचेरा…
◆स्थानिक समस्या सोडविण्याचे ग्रामस्थांना दिले आश्वासन.
मूलचेरा:…तालुक्यातील अतिसंवेदनशील बोल्लेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील पुल्लीगुडम या गावाला माजी आमदार दिपकदादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष कांकडालवार यांदोघांनी चक्क दुचाकीने दौरा केले. या दौऱ्यादरम्यात बोल्लेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पुल्लीगुडम येथील नागरिकांची भेट घेऊन गावातील स्थानिक समस्या बद्दल छोटेखानी सभा घेण्यात आली. या सभे दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी रस्ते,पिण्याचे पाणी,आरोग्य,विद्युत विभाग व शिक्षणा संबधी समस्या मांडले..या समस्या सरकार पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.यावेळी जि प गडचिरोली चे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सुद्धा उपस्तितांना योग्य मार्गदर्शन केले.
पुल्लीगुडम येथील दौऱ्याप्रसंगी माजी आमदार आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे सोबत आविसचे नंदूभाऊ मटामी आविस तालुकाध्यक्ष एटापल्ली,श्रीकांत चिप्पावार उपाध्यक्ष आविस एटापल्ली,कारूजी रापंजी सल्लागार आविस,गणेश हलामी सरपंच ग्रा प बोल्लेपल्ली,साधना कुडयेटी ग्रा प सदस्या,रामजी कांदो,महारु पुंगाटी,आनंदराव चांदेकर,सूर्यप्रकाश चांदेकर,प्रवीण वाकडे,दिलीप गंजीवार माजी सरपंच आलापल्ली, महावीर अग्रवाल,सल्लागार आविस,विजय कुसनाके माजी सरपंच आलापल्ली,प्रज्वल नागुलवार सामाजिक कार्यकर्ते,रमेश वैरागडे, प्रशांत गोडसेलवार स्वीकृत सदस्य न प अहेरी,राकेश सडमेकसह आविसचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.