जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ‘बाळा मीच तुझी आई रे’ या नाट्यप्रयोगाचे उदघाटन…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथील धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या सौजन्याने धनंजय स्मृती रंगभूमी वडसा नाट्य कला मंडळाकडून आयोजित’बाळा मीच तुझी आई रे’ नावाचं नाट्यप्रयोगाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी,विशेष अतिथी म्हणून किष्ठापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास आत्राम,नागोराव सोनुले हे होते.प्रमुख अतिथी म्हणून वेलगूर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम,उपसरपंच उमेश मोहुर्ले होते.
यावेळी मंचावर प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,प्रभाकर शेंडे,आशांना दुधी माजी सरपंच वेलगुर,हरिदास आत्राम,पतृजी शेंडे गाव पाटील,मोतीराम मोहूर्ले,मेघाजी,नागोराव सोनूले,मनोहर चालूरकर पोलीस पाटील,डॉ.गोपाल मंडल, विलास शेंडे,मारोती ओजवर,भगवान गुरनुले,प्रवीण कोटरंगे,दिलीप कावळे,तुळशीराम गुरनुले,उमेश मोहूर्ले उपसरपंच वेलगुर,महेश मोहूर्ले,मोरेश्वर कोटरंगे,भिकारू कोटरंगे,भीमराव गुरनुले,शहाजी गुरनुले,शहाजी निकुरे,सदाशिव नागोसे,चित्तुजी बीश्वास ,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील नाट्य प्रेमी,समस्त गावकरी तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.