अहेरी तालुका
काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार कडून चालूरकर कुटुंबियांची सांत्वन…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी..
अहेरी : तालुक्यातील मोदूमतूर्रा येथील आविसं,काँग्रेसचे कार्यकर्ते शंकरभाऊ चालुरकर यांचे मातोश्री पोचुबाई चालुरकर यांचे दीर्घ वृद्धापकाळाने निधन झाले होते.या दुःखद निधनाची वार्ता मोदुमतूर्रा येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी मोद्दूमतूर्रा येथे जाऊन येथील चालुरकर कुटुंबांला भेट देऊन त्यांचे आस्थेने स्वांत्वन केले.
यावेळी विनोद आलाम ग्रामपंचायत सदस्य,माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यप्रकाश पेंदाम,माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण मज्जेलवार,वासुदेव पानेम,लिंगन्ना मज्जेल्वार,चद्रय्या आलाम,डोबा कोरेत,लक्ष्मण आत्राम उपस्थित होते.