कंकडालवार दाम्पत्यानी घेतली दक्षिण मुखी हनुमंतांची दर्शन…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…
अहेरी : काल हिंदू नववर्ष गुडीपाडव्याचा शुभ दिनी अहेरी येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात अयोध्यावरून आलेल्या अखंड ज्योती काल अहेरीत पोहोचली. काल संध्याकाळी अहेरी नगरात प्रभू श्रीरामाच्या पालखीची अन अखंड ज्योतीची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.या शोभयात्रेला अहेरीकरांची प्रचंड उपस्थिती होती.जय श्रीरामच्या घोषनेणी अहेरी नगर दुमदुमली तसेच शोभायात्रेला हनुमान भक्तांची उपस्थिती लक्षनीय ठरली होती.
या शोभा यात्रेला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सहभागी होऊन दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमंतांची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.
यावेळी कंकडालवार दाम्पत्यानी समस्त जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,प्रकाश दुर्गे,कुमार गुरनुले,नितीन पुल्लूरवार प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील व स्थानिक रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.