जि.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या स्वगृही उभारली गुढी…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी….
अहेरी : गुढीपाडवा निमित्त आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या अहेरी येथील स्व:गृही हिंदू नववर्षाचे गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले.यानिमित्त त्यांनी मराठी व तेलुगु बांधवांना आणि समस्त जनतेला गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण असून,यानिमित्त घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला जातो.अजय कंकडालवार यांनीही परंपरेनुसार आपल्या घरी गुढी उभारली आणि नववर्ष सुख-समृद्धीचे जावो,अशी प्रार्थना केली.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून.शहरभरात आणि ग्रामीण भागातही गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांचे मातोश्री मंदाबाई रामय्या कंकडालवार,धर्मपत्नी सोनालीताई कंकडालवार, युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.