मुंबई येथील सांस्कृतिक कार्यक्रमात सिरोंचा येथील अविष्कार इंग्लिश मिडीयम शाळेनी घेतली सहभाग..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसेशन संस्था कडून दिनांक 18 जानेवारी 2024 ते 19जानेवारी 2024 पर्यंत बायकळा मुंबई येथे राज्यव्यापी अधिवेशन आणि विद्यार्थीचे राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.
या कार्यक्रामाध्ये तेलंगाना व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेला व गडचिरोली जिल्हा मुख्यलयापासून 240 किलोमीटर दुरीवर असलेला सिरोंचा येथील जिजामाता शिक्षण संस्था खेड पूणे द्वारा संचलित अविष्कार इंग्लिश मिडीयम या शाळेचे विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेतला आणि तिथे कार्यक्रमात पारितोषिक हि पटकविले,आणि त्या कार्यक्रमामध्ये काही उत्कृष्ट मुख्याध्यापक व उत्कृष्ठ शिक्षकांना म्हणून अवार्ड वितरण करण्यात आले, यामध्ये सिरोंचा येथील आविष्कार इंग्लिश मिडीयम स्कूल सिरोंचाचे मुख्याध्यापिका तथा संस्था चालक करुणा पुरुषोत्तम जोशी यांना उत्कृष्ठ मुख्याध्यापिका म्हणून तर राजु अर्जन्ना चिंतला यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.