ऑटो युनियनचे चालक मालक संघटनेकडून माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना निवेदन
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…आल्लापल्ली
*आल्लापल्ली -अहेरी या मुख्य रस्त्याची दुरुस्तीसाठी संबंधितांना पाठपुरावा करण्यासाठी निवेदन* *आल्लापल्ली*.....मागील तीन वर्षांपासून आल्लापल्ली येथून अहेरीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची चाळणी झाल्याने या रस्त्यावरून ऑटो चालविणे कठीण जात असल्याने कृपया आपण तरी या रस्त्याची दखल घेऊन या रस्त्याची तात्काळ दुरुस्तीसाठी सरकार व संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा अश्या आशयाचे निवेदन आज ऑटो चालक मालक संघटनेकडून अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम यांना दिले. ऑटो युनियनकडून माजी आमदार आत्राम यांना दिलेल्या निवेदनात,मागील दोन वर्षे कोरोनामुळे आमच्यावर उपासमारीची संकट आली होती.आता कोरोना नियंत्रणात आली असली तरी आल्लापल्ली व अहेरी या रस्त्याची खड्डयांनी चाळणीच झाल्याने या रस्त्यावरून ऑटो चालविणे कठीण जात असून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवशीही ऑटोने प्रवास करायला तयार होत नसून या रस्त्यामुळे परत आम्हाला उपासमारीची सामना करावं लागतं आहे.म्हणून आपण आपल्या स्तरावरून या रस्त्याची तात्काळ डागडुजी करिता सरकार व संबंधित विभाग प्रमुखांकडे आवश्यक पाठपुरावा करण्याची विनंती ही त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी ऑटो चालक मालक युनियनचे पदाधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा करून सरकार व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना निवेदन देतांना,माजी जि.सदस्य संजयभाऊ चरडुके,युनियनचे अध्यक्ष जुलेख शेख, इबना हुसेन, शफिक शेख, अन्वर पठाण, मुजाहिद शेख, शब्बीर शेख, जुनेद शेख, बंडू कुळमेथे, महेंद्र डोंगरे, पुरुषोत्तम मेश्राम,इरफान हुसेन, नकीर शेख,मझहर शेख,बंडू चांदेकर, गुलशन दुर्गे,आसिफ शेख आदी पदाधिकारी उपस्तीत होते.