अहेरी तालुका

आल्लापल्ली येथे राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके स्मृतिदिन कार्यक्रम थाटात संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …आल्लापल्ली…

अहेरी: आल्लापल्ली येथे राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे स्मृतिदिन कार्यक्रम येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनच्या वतीने गोंड मोहल्यातील गोटूल भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांकडून आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून आदिवासी प्रथेनुसार विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे बलिदानाबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन करून शहिदाचे प्रतिमेला अभिवादन केले. या कार्यक्रमाला आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे ईश्वर वेलादी, शंकर सिडाम,सुमनबाई सिडाम, रघुपती सिडाम,मुरलीधर सडमेक, मीराबाई सडमेक, माजी सरपंच विजय कुसनाके,कोष समिती अध्यक्ष स्वामी वेलादी, ग्रा.पं. सदस्या मायताई कोरेत,ग्रा.पं. सदस्य संतोष अर्का, ग्रा.पं. मनोज बोल्लूवार,उमेश आत्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मृती दिन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी मधुकर मेश्राम,प्रकाश कोरेत,नागेश मेश्राम,राजू वेलादी,अविनाश मेश्राम रुपेश आत्राम,सुरज मडावी,प्रतीक गेडाम,सुरज मेश्राम,तिरुपती वेलादी,दिपक मेश्राम,राहुल सडमेक, जगन्नाथ सिडम,रितीक आत्राम,मनोज सडमेक,अतिष कुमरे,राहुल सिडम, सुनील आत्राम,सचिन सिडाम आदीनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close