आलापल्ली येथे बौद्ध विहार बांधकामाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …अहेरी तालुका
📝अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे बौद्ध विहार समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना या गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी १५ व्या वित्त आयोग जिल्हा परिषद स्तरावरून मंदिरसाठी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने या कामाचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष आयु भीमराव झाडे, तालुका अध्यक्ष आयु बी एम दूर्गम सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चे अध्यक्ष आयु कार्तिक निमसरकार, ग्रा पं सदस्यां आयुषमती सुमन खोब्रागडे आणि इतरही अनेक उपासक उपासिका व कार्यकर्ते उपस्थित होते.