अहेरी तालुका

आष्टी ते आल्लापल्ली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई द्या !

📝गडचिरोली :-आष्टी ते आलापली या राष्ट्रीय महामार्ग क्र.353 वरील तलाठी कार्यालय साझा क्रमांक.9 मधील बोरी,राजपूर पॅच,शिवनीपाठ या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत,मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येथून लोह खनिज उत्खनन करून या मार्गावरून दररोज हज़ारों ट्रक ये-जा करत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णत धूळ पसरत असल्याने शेतातील कापूस,धान या उभी पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली होती. त्यानुसार महसूल विभाग व कृषि विभागा कडून पीक नुकसानीची सर्वे केले मात्र अजून पर्यंत मोबदला मिळाले नाही. त्यामुळे परत तहसीलदार अहेरी यांना पुन्हा या संदर्भात निवेदन देण्यात आली असून येत्या 12/12/2022 सम्पूर्ण शेतकऱ्यांना नुकसानीची योग्य मोबदला न मिळाल्यास उपोषनाला बसण्यात येईल असे इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आली.तहसीदारांना निवेदन देतांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सहित माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, गावातील प्रतिस्टित व शेतकरी श्री.शंकर कोडापे सरपंच बोरी,सौ.मीनाताई वेलादी सरपंच राजपूर प्याच, सुरेश गंगाधरीवार माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य,सुरेश आदे,गोपाळ आदे,चंदु मौहूर्ले,बळवंत आदे,नागेश मोहूर्ले,मीना कावळे,रुपेश चांदेकर,सतीश दैदावार,विलास निकेसर,नागेश वेलादी,शंकर पम्पेलवार, शायलू मडावी सरपंच खमनचेरु,प्रभाकर मडावी,मारोती मडावी,नितीन गुंडावार,अजय मडावी,शोभा मडावी,मधुकर वेलादी,शंकर कम्पेलवार, रुपेश चांदेकर, शंकर निकेसार,बापू ठाकरे,रामुलु कुळमेथे,मधुकर वेलादी,जितेंद्र शेंडे,सुरेश आदे,सुरेश निकेसर, नागेश मोहूर्ले,रामभाऊ आदे,गोपाळा आदे,पेंटू अलोने,सुरेश आडे,गोपाळा आदे, चंदू मोहूर्ले,प्रभाकर वेलादी,मारोती मडावी,अजय मडावी,नागेश मोहूर्ले,भीमराव कॅम्पेलवार,पतरूजी ठाकरे,दसरू निकोडे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close