अहेरी शहरातुन जाणाऱ्या जडवाहनांना बंदी घाला ….अन्यथा चक्काजाम आंदोलन करू…

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटटापली तालुक्यातील सूरजागड येथून लोहखनिज घेवुन जाणारे जड़ वाहन तसेच तेलंगणा राज्यातून क्रेसर गिटटी घेवुन अहेरी -आलापली मार्गी जड़ वाहन जात असून अहेरी येतील दक्षिण हनुमान मंदिर ते परिवहन मंडळ (बस स्टॉप) पर्यंत दोन्ही बाजूंनी घरे व लहान-मोठे दुकाने असून या जड़ वाहनामुळे लोहायूक्त दूर पसरत असून अहेरी शहरातील नागरिकांना व व्यापारर्याना नाहक त्रास करवा लागत आहे.त्यामूळे सदर रस्त्यांवरील जड़ वाहन बंद करावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.
.प्राप्त माहिती नुसार सूरजागड वरून लोहायूक्त भरून जड़ वाहन अहेरी वरून मार्ग क्रम करत आहेत,तसेच तेलंगणा राज्यातून क्रेसर गिटटी अहेरी उपविभागांमध्ये आणले जात आहे त्यामूळे सदर रस्ता वाहतुकीस या मार्गावरून रहदरी करण्यास प्रवेश बंदी असतो,मात्र जड़ वाहन सुरू असल्याने खड्डे पडून रस्ता खराब होत आहे,तसेच नागरिकांना त्रास होत आहे त्यामूळे सदर रस्त्यावरून जड़ वाहन बंद करावे असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सम्बंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना त्वरित सदर मार्ग जड़ वाहतुकीस बंद करण्याच्या निर्देश देण्यात यावी अन्यथा चक्काजमा आंदोलन करण्यात येईल असे इशारा देण्यात आली..