अहेरी तालुका

आवलमरी-व्येंकटापूर येथील पोचम्मा देवी बोनालु यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी …तालुक्यातील आवलमरी- व्येंकटापुर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पोचम्मा देवीची बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.
या बोनालू यात्रेला आदिवासी विद्यार्थी संघाचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून पोचम्मा देवींची आशीर्वाद घेतले.
यावेळी बोनालू यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समवेत सूनंदाताई कोडापे सरपंच,चिरंजीव चीलवेलवार उपसरपंच, ग्रा. प. सदस्य वसंत तोरेम, सरिता मडावी, लक्ष्मीबाई मुरमाडे, मारोती मडावी,विमलताई चटारे, अमसुबाई सिडाम, कमलाबाई आत्राम, ग्रां. प. सदस्य, प्रतिष्ठित नागरिक जगय्या परकिवार, पुजारी ,पेसा अध्यक्ष नामदेव मडावी, पोलिस पाटील मनोहर पागडे, व्यंकटेश गणपुरवार, पेसा सदस्य रेश्मा तलांडी, रोजगार सेवक व्यंकटेश कोडापे, माजी सरपंच गुलाब सोयाम, महेश लेकुर ग्रा.प सदस्य , नरेंद्र गर्गम, संजय गोंडे, प्रमोद गोडशेलवार आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून देवींची आशीर्वाद घेतले. या यात्रेला आवलमरी व व्येंकटापूर सह परिसरातील नागरिक व भक्तगण मोठया संख्येने उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close